India vs New Zealand 2022: भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला टी 20 सामना आज वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र वेलिंग्टनमध्ये तुफान पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना हा रविवारी माऊंट माऊनगनुई येथे खेळवला जाणार आहे. तेथील हवामान अंदाज देखील फारसा काही चांगला नाही. मात्र दोन दिवसात हवामानात काही बदल होईल अशी आशा करायला काही हरकत नाही. 


तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. आता दुसरा सामना 20 नोव्हेंबरला होणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता माउंट मौनगानुई येथे सुरू होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील न्यूझीलंडमध्ये होणारा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


वाचा : भारत- न्यूझीलंड पहिला T20 सामना रद्द  


हा सामना न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार 20.51 वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार 1.21 वाजता सामना रद्द करण्यात आला. या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंडला 25 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे. दुसरा सामना रविवारी 20 तारखेला तर तिसरा सामना 22 नोव्हेंबरला मंगळवारी मॅक्लिन पार्क, नेपियर येथे खेळायचा आहे.