India vs New Zealand T20 Live Score - टी-20 विश्वचषकानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना आज वेलिंग्टन येथे रंगणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.
18 Nov 2022, 13:34 वाजता
न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिला टी-२० सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला आहे. आता रविवारी माऊंट माउंगानुईमध्ये हवामान चांगले राहण्याची अपेक्षा करू शकतो.
18 Nov 2022, 12:48 वाजता
IND vs NZ : वेलिंग्टनमध्ये पाऊस सतत वाढत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.१६ पर्यंत पाऊस न थांबल्यास आजचा सामना रद्द करण्यात येऊ शकतो.
18 Nov 2022, 12:23 वाजता
खेळाडूंनी चाहत्यांची भेट घेतली
पावसामुळे नाणेफेक अद्याप झालेली नाही. खेळाडूंनी घेतली चाहत्यांची भेट
18 Nov 2022, 12:20 वाजता
बीसीसीआयचं ट्वीट
Toss at Sky Stadium, Wellington has been delayed due to persistent rains.
Stay tuned for further updates.#NZvIND pic.twitter.com/e2QJYdAnRN
— BCCI (@BCCI) November 18, 2022
18 Nov 2022, 12:10 वाजता
नाणेफेक अद्याप नाही
वेलिंग्टनमध्ये खराब हवामान आणि पावसामुळे टॉस अद्याप झालेला नाही. सध्या मैदानात झाकून ठेवण्यात आले. तसेच न्यूझीलंडमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे खेळपट्टी लवकर सुकवता येते.
18 Nov 2022, 12:08 वाजता
Ind vs Nz T20 Update: वेलिंग्टनमध्ये पाऊस, सामना उशिरा सुरू होऊ शकतो