K S Bharat | पदार्पणाआधीच राखीव विकेटकीपर केएस भरत चमकला, न्यूझीलंड विरुद्ध दमदार कामगिरी
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (Team India vs New Zealand 1st Test) यांच्यात कानपूरमध्ये (Kanpur Test) पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस आहे.
कानपूर | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (Team India vs New Zealand 1st Test) यांच्यात कानपूरमध्ये (Kanpur Test) पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने सरशी मिळवली आहे. या तिसऱ्या दिवसाच्या खेळात विकेटकीपर केएस भरतला (K S Bharat) सबटीट्यूड विकेटकीपर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. केएसने या संधीचं सोनं केलं. (india vs new zealand 1st test day 3 Before the debut substitute wicket keepar k s bharat take sensetional catch and stumping)
विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला केएसने शानदार किपींगच्या जोरावर न्यूझीलंडच्या सेट फलंदाजांना कॅच आणि स्टपिंग करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. केएसने कसोटी पदार्पणाआधीच केलेल्या उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरीमुळे त्याचं कौतुक होतंय. तसंच केएस ट्विटरवरही ट्रेंड करतोय.
साहाला दुखापत केएसला संधी
न्यूझीलंड विरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नियमित विकेटकीपर रिषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रिद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) पंतच्या जागी विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली. मात्र रिद्धीमान तिसऱ्या दिवसाच्या खेळासाठी मानेच्या त्रासामुळे उतरणार नसल्याची माहिती बीसीसीआयने (Bcci) ट्विटद्वारे दिली.
साहाला झालेली मानेची दुखापत ही केएस भरतच्या पथ्यावर पडली. पदार्पणाच्या शोधात असलेल्या केएसला सबटिट्यूड म्हणून किपींग करण्याची संधी मिळाली. केएसने त्याला मिळालेल्या संधीचं पूर्णपणे फायदा उचलला.
न्यूझीलंड मजबूत स्थितीत, पण.....
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने बिनबाद 129 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने केलेल्या 345 धावांच्या तुलनेत न्यूझीलंड केवळ 216 धावा दूर होती. त्यामुळे टीम इंडियावर काहीशा प्रमाणात दबाव होता.
न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाची सावध सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामी जोडीने तिसऱ्या दिवशी 129 धावांमध्ये आणखी 21 धावा जोडल्या. टीम इंडिया अजूनही विकेटच्या शोधात होती. मात्र फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने टीम इंडियाला ब्रेक थ्रू मिळवून दिला.
अश्विन न्यूझीलंडच्या डावातील 67 वी ओव्हर टाकायला आला. यया ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर शतकाच्य दिशेने वाटचाल करणाऱ्या विल यंगचा काटा काढला. अश्विनने यंगला कॅच आऊट केलं. यामध्ये जितकं योगदान अश्विनचं होतं, तितकंच किंबहुना त्यापेक्षा अधिक केएसचं होतं.
अश्विनने टाकलेला चेंडू हवेत काही प्रमाणात स्विंग होऊन ऑफ स्टंपच्या दिशेने वळला. या दरम्यान चेंडूचा आणि विल यंगच्या बॅटचा संपर्क झाला. बॅटला कट लागल्यानतंर चेंडू फार उडाला नाही. मात्र केएसने चतुरतेने तो कॅच टिपला. केएसने यंगनंतर रॉस टेलरचाही कॅच घेतला. तसंच टॉम लॅथमलाही स्टंपिंग आऊट केलं.
केएसने घेतलेला कॅच
दरम्यान केएसने दाखवलेल्या हुशारीबद्दल आणि त्याने घेतलेल्या कॅचबद्दल त्याचं कौतुक होतंय. कदाचित केएसला न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते.