India Vs New Zealand 2nd Test Pune: भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमधील पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान गावसकरांनी रोहितवर निशाणा साधला. फिरकी गोलंदाजांसाठी लाँग ऑन आणि लाँग ऑफला फिल्डर्स ठेवण्याच्या रोहितच्या निर्णयावर गावसकर संतापले. पहिल्या सत्राच्या खेळात घडलेला हा प्रकार पाहून गावसकरांनी रोहित फारच बचावात्मक पवित्रा स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे.


गावसकर नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यातील 19 व्या षटकामध्ये रोहितने लावलेली फिल्डींग पाहून गावसकर संतापले. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर लावलेली फिल्डींग पाहून कॉमेंट्री करणाऱ्या गावस्करांनी लाइव्ह सामन्यादरम्यानच नाराजी व्यक्त केली. "तुम्ही अशी फिल्डीगं लावली ज्यात फलंदाज उडता फटका मारण्याआधीच तुम्ही फिरकी गोलंदाजांसाठी लाँग ऑन आणि लाँग ऑफला खेळाडू उभे केलेत तर अशा कर्णधाराला बचावात्मक कर्णधारच म्हणावं लागेल. तो नकारात्मक कर्णधार असून फारच बचावात्मक पद्धतीने खेळणार कर्णधार आहे. इथे आता तुम्ही चौकार आणि षटकार वाचवण्याचा प्रयत्न करताय," असं म्हणत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. "(फिल्डींग बदलल्यानंतर) याला उत्तम रचना म्हणता येईल. कारण फिरणाऱ्या चेंडूंचा विचार करुन लाँग ऑनला खेळाडू उबा केला आहे. मिड ऑफ आतल्या बाजूला आहे आणि फिरता चेंडू पाहता अशीच फिल्डींग हवी," असं गावसकर म्हणाले. 


शास्री गुरुजीही संतापले


भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिल्या डावामध्ये फारच बचावात्मक पवित्रा स्वीकारल्याचं म्हटलं. "पहिल्या सत्रात फारच बचावात्मक खेळ केला. त्यावेळेस चेंडू पकड घेत असताना असा खेळ केला गेला. तुम्ही लाँग ऑन आणि लाँग ऑफ ठेवता जेव्हा तुम्ही न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या हातून स्वत:ला खेळवून घेत असल्यासारखं आहे," असं रवी शास्त्री 48 व्या ओव्हरला काँमेंट्री करताना म्हणाले. 


1)



2)



नक्की वाचा >> दुसऱ्या कसोटीत टीम इंडियापेक्षाही पुणेकरांचे अधिक हाल! पाण्यासाठी घोषणाबाजी, दुर्गंधीयुक्त टॉयलेट्स अन्...


गोलंदाजांनी सावरलं; फलंदाजांनी निराश केलं


दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं 259 धावांवर रोखलं. भारतीय गोलंदाजांची टीचून गोलंदाजी करुन पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाला तंबूत धाडण्यात यश मिळवलं. पहिल्या डावामध्ये दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची कामगिरी फारच सुमार झाली. भारतीय संघ लंचच्या आधीच 36 ओव्हरमध्ये 104 वर सात गडी बाद अशा अवस्थेत पोहोचला. मात्र भारतीय संघांपेक्षा मैदानात आलेल्या चाहत्यांची अवस्था अधिक दयनीय असल्याचा टोलाही काही चाहत्यांनी येथील सुविधांवरुन लागवला आहे.