India vs New Zealand 3rd T20 Match: राहुल द्रविडची यंगिस्तान सध्या न्यूझीलंड (NZ vs IND) दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी सीरीज खेळली जात आहे. या सिरीजचा (India vs New Zealand 3rd T20) तिसरा सामना 22 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. पहिला सामना पावसात वाहून गेल्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना 65 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र तिसऱ्या T20 सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसलाय. (india vs new zealand 3rd t20 match kane williamson replace by mark chapman)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या T20 सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी आता संघात एका घातक खेळाडूची एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. मेडिकल अपॉइंटमेंटमुळे केन विल्यमसन तिसऱ्या T20 सामन्यात खेळू शकणार नाही. अशातच त्याच्या जागी 28 वर्षीय स्टार फलंदाज मार्क चॅपमनला (Mark Chapman) संघात स्थान देण्यात आलंय. मार्क चॅपमन टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.


केन विल्यमसनच्या तोडीचा फलंदाज न्यूझीलंडकडे असल्याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय. चॅपमनने 40 T20 सामन्यांमध्ये 761 धावा केल्यात, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच त्यानं 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 261 धावा चोपल्या आहेत. त्याचा अनुभव पाहता भारताविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.


आणखी वाचा - वर्ल्ड कप पराभव जिव्हारी, टी 20 सोबत वनडे कॅप्टन्सीचा राजीनामा, क्रिकेट विश्वात खळबळ!


दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) जागी शुभमन गिलचा (Shubman Gill) संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. शुभमन गिल संघात परत आल्याने टीम इंडियाला लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन मिळू शकतं. तर दुसरीकडे रिषभ पंतला (Rishabh Pant) संघातून डच्चू मिळण्याची देखील चर्चा आहे.