मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनच्याऐवजी टीममध्ये मुंबईकर पृथ्वी शॉची निवड झाली आहे. या वनडे सीरिजसाठीच्या टीमवर नजर टाकली तर मुंबईकर खेळाडूंचाच दबदबा पाहायला मिळत आहे. वनडे टीममध्ये १६ खेळाडूंपैकी ५ खेळाडू, तर टी-२० टीममध्ये १६पैकी ४ खेळाडू मुंबईचे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे टीममध्ये मुंबईकर असलेल्या रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे टी-२० टीममध्ये पृथ्वी शॉ वगळता इतर चारही मुंबईकर खेळाडू आहेत.


न्यूझीलंडमध्ये टीम इंडिया ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. २४ जानेवारीपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.


भारतीय टी-२० टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव


वनडे टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, केदार जाधव


टी-२० सीरिज


२४ जानेवारी- पहिली टी-२०- इडन पार्क, ऑकलंड


२६ जानेवारी- दुसरी टी-२०- इडन पार्क, ऑकलंड


२९ जानेवारी- तिसरी टी-२०- सिडन पार्क, हॅमिल्टन


३१ जानेवारी- चौथी टी-२०- वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन


२ फेब्रुवारी- पाचवी टी-२०- बे ओव्हल, माऊंट मांगनुई


वनडे सीरिज


५ फेब्रुवारी- पहिली वनडे- सिडन पार्क, हॅमिल्टन


८ फेब्रुवारी- दुसरी वनडे- इडन पार्कस ऑकलंड


११ फेब्रुवारी- तिसरी वनडे- बे ओव्हल, माऊंट मांगनुई


१४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी- सराव सामना- न्यूझीलंड-११ विरुद्ध भारत


टेस्ट सीरिज 


२१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी- पहिली टेस्ट- बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन


२९ फेब्रुवारी ते ४ मार्च- दुसरी टेस्ट- हेगले ओव्हल, क्राईस्टचर्च