India vs New Zealand 1st ODI: भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका आजपासून सुरु होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium Hyderabad) होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. त्याचवेळी न्यूझीलंडने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. वनडेत दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर दुसरीकडे आजच्या पहिल्या सामन्यात क्रिकेटप्रेमींच विराट कोहलीवर (virat kohali) नजर असेल.


विराट कोहलीची कारकीर्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांच्या आकड्यापासून फक्त 119 धावा दूर आहे. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो हा आकडा पार करु शकतो, असा विश्वास देखील अनेकांना आहे. विराटने आतापर्यंत 268 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12754 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 58.68 आहे तर स्ट्राइक रेट 93.68 आहे. वनडे फॉरमॅटमधील विराटची सार्वाधिक धावसंख्या 183 आहे. याशिवाय विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये 46 शतके झळकावली आहेत. यानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25000 धावांच्या आकड्यापासून फक्त 119 धावा दूर आहे. 



सामना किती वाजता सुरू होणार?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आजपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. 


वाचा: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर


सामना कोणत्या चॅनेलवर दिसेल?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्टस नेटवर्कवर पाहू शकता. 


मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग या अॅपवर होणार?


क्रिकेटप्रेमींना डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. मात्र डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारचे सामने प्लॅनशिवाय पाहता येणार नाहीत. 


दोन्ही संभाव्य संघ


टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मोहम्मद शमी


न्यूझीलंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन


फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, सँटनर, ईश सोढी, फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि डग ब्रेसवेल


भारत-न्यूझीलंड मालिका (संपूर्ण वेळापत्रक):


वनडे मालिका


पहिला एकदिवसीय -18 जानेवारी, हैदराबाद
दुसरी वनडे - 21 जानेवारी, रायपूर
तिसरी एकदिवसीय - 24 जानेवारी, इंदूर


टी-20 मालिका


पहिला T20 - 27 जानेवारी, रांची
दुसरा T20 - 29 जानेवारी, लखनौ
तिसरा T20 - 1 फेब्रुवारी, अहमदाबाद