Gold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर

Today Gold Silver Price:  सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. अशावेळी मात्र तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 

Updated: Jan 18, 2023, 09:44 AM IST
Gold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर  title=
gold silver price on 18 january 2023 gold silver rate stable in city

Today Gold Silver Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने-चांदीच्या (gold silver rate) दरात चढ-उतार दिसून येत आहे. ही परिस्थिती कायम असून या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात आतापर्यंतचा उच्चांक ओलांडला आहे. दरम्यान आज (18 जानेवारी 2023) सोन्याच्या दरात 58500 रुपयांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम अनेक ग्राहकांना सोने खरेदीकडे सध्या पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी सोने मोडण्याकडे आपला कल वळवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

दर दोन दिवसांनी नवे दर जाहीर 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सप्ताह सुरू होतो. अशा परिस्थितीत आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची (gold silver) वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. यामध्ये इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने नवे दर जाहीर केले आहेत. यावेळी मात्र त्यापेक्षा पाचशे रुपयांची वाढ जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने हे दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर काही ग्राहकांनी मात्र या वाढत्या सोन्याच्या दरात फायदा घेण्यासाठी सोने मोड करण्याकडे कल वळवला आहे.  दरम्यान प्रतितोळा सोने 58 हजार 500 रुपये एवढा झाला आहे. तर चांदीचा दर 69 हजार 167 रुपयांवर पोहोचला आहे. 

वाचा: वर्षातील पहिली एकादशीला असे करा व्रत,जाणून घ्या शुभ योग आणि महत्व

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x