माउंट माउंगानुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या शेवटची टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय संघानं टी-२० सीरिज याआधीच जिंकल्यानं टीम इंडियाचा पारडं जड मानलं जातं होतं. भारताने टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय़ घेतला होता. विराट कोहलीला आज विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण रोहितही दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आणि केएल राहुलने ही जबाबदारी पार पाडली. या सामन्यात भारताचा ७ रनने विजय झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमवत 163 रन केले होते. न्यूझीलंडची टीम 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत 156 रन करु शकली. पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंडमध्ये 5 सामन्यांची टी20 सीरिज झाली. ज्यामध्ये भारताने नवा इतिहास रचला आहे.


न्यूझीलंडची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्येच जसप्रीत बुमराहने मार्टिन गप्टिलला LBW आउट करत 2 रनवर माघारी पाठवलं. त्यानंतर कॉलिन मुनरो 15 रनवर आउट झाला. टॉम ब्रूस शुन्यावर आऊट झाला. तर टिम शिफर्ट 50 रनवर आऊट झाला. डेरिल मिशेल फक्त 2 रन करत आऊट झाला.


भारताकडून रोहित शर्माने रिटायर्ड हर्ट होईपर्यंत ६० रनची खेळी केली. तर केएल राहुलने 45 रन आणि श्रेयस अय्यरने नाबाद 33 रन केले. मनीष पांडेने 4 बॉलमध्ये 11 रन केले.