India vs New Zealand 3rd T20: भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारतासाठी (Team India) हा विजय सर्वात  महत्त्वाचा असेल, कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. पण भारताच्या 3 स्टार खेळाडूंमुळे टीम इंडिया (Team India) विजयाची नोंद करु शकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भारताने शुभमन गिलच्या (Shubman Gill) नाबाद 126 धावांच्या जोरावर न्यूझीलंडपुढे 2350 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करतानाच न्यूझीलंड संघाचा सुरूवातीलाच 4 बाद 7 अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळीच भारत हा सामना जिंकणार, हे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) डाव फक्त 66 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने यावेळी 168 धावांची दणदणीत विजय साकारला. भारताचा हा या वर्षातील सलग दुसरा मालिका विजय ठरला आहे. 2023 हे वर्षाची सुरूवात भारताने तिसरा सामना जिंकत  इतिहास रचला आहे. 


वाचा:  शुभमन गिल याच्या एका शतकानंतर Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह


टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या सामन्यात गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. हार्दिकने 4 विकेट्स मिळवल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा ठरला. त्याचबरोबर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. हार्दिकला यावेळी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि उमरान मलिक (Umran Malik) या वेगवान गोलंदाजांनी सुयोग्य साथ दिल्याचे पाहायला मिळाले. 


तर दुसरीकडे भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या (India vs New Zealand) तिसऱ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने नाबाद 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपले पहिले वहिले टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. गिलने पूर्ण 20 षटके खेळली. शुभमन गिलला  राहुल त्रिपाठीने 44 तर हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 30 धावा करून चांगली साथ दिली. गिलने भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या.