कानपूर: भारत विरुद्ध न्यूझीलंड 2 कसोटी सामन्यातील पहिला सामना आज कानपूरमध्ये खेळवला जात आहे. ग्रीन पार्क स्टेडियममध्ये हा सामना सुरू आहे. सामना सुरू असताना स्टेडियममध्ये जे घडलं त्यामुळे सर्वांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. लाईव्ह सामना सुरू असताना स्टेडियममध्ये खेळाडूंना जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल क्रिझवर खेळण्यासाठी उतरला. त्यावेळी स्टेडियममध्ये काही लोकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. स्टेडियममध्ये एकच आवाज घुमायला लागला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 


टीम इंडिय़ाची बॅटिंग सुरू असताना सहाव्या ओवर दरम्यान हा प्रकार घडला. स्टेडियममध्ये काही क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा सुरू केल्या. यावेळी काइल जेमिसनची ओवर सुरू होती. तर शुभमन गिल फलंदाजी करत होता. 


मुरली कार्तिक आणि कमेंटेटर ऑफ स्पिन बॉलवर चर्चा करत होते. यावेळी काही लोकांनी स्टेडियममध्ये अशा घोषणा देऊ लाईव्ह सामन्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 



अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे देण्यात आलं आहे. या सामन्यात अनेक नव्या आणि तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.


श्रेयस अय्यरला कसोटीमध्ये पदार्पणाची संधी देण्य़ात आली आहे. शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव अशी टीम आहे.