पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामन्यावर संकटाचा ढग दिसत आहे. पुण्यातील सामना आज दुपारी १.३० वाजता खेळवण्यात येणार आहे. पिच क्यूरेटरने माहिती लिक केल्याने सामन्यावर संकट होते. दरम्यान, बीसीसीआयने हा सामना रद्द होणार नाही, अशी माहिती देत संबंधित पिच क्यूरेटरला निलंबित करण्यात आल्याचे म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली.



मैदानाची माहिती लिक केल्यानंतर न्यूझीलंडविरूद्धचा आज पुणे इथल्या मैदानावर होणारा सामना रद्द होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, माहिती देणाऱ्या पिच क्यूरेटरला निलंबित करण्यात आले असून दुसरा नेमून सामना घेण्यावर बीसीसीआय ठाम आहे. 



मैदानाच्या खेळपट्टीची देखभाल करणाऱ्या क्युरेटर पांडुरंग साळगांवकर यांनी खेळपट्टीबाबतची माहिती जी गुप्त ठेवणं आवश्यक असते ती लिक करण्यात आली. त्यामुळे आजच्या सामन्यावर बालंट येण्याची शक्यता होती. एका स्टींग ऑपरेशनने दोन गोलंदाजांसाठी खेळपट्टीमध्ये काही बदल करता येऊ शकतात का? असं साळगांवकरांना विचारलं. यावर साळगांवकर लगेच तयार झाले, असा दावा करण्यात आलाय.