राजकोट : पहिल्या टी-२० मॅचमध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दाखवणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाहूयात या मॅचमध्ये टीम इंडियाला नेमका कशामुळे पराभवाचा सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या टीमने पहिल्यांदा बॉलिंग करत टीम इंडियाच्या बॉलर्सची धुलाई केली. त्यानंतर जबरदस्त बॉलिंग करत टीम इंडियाच्या बॅट्समनला आऊट केलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने न्यूझीलंडच्या बॉलर्सला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र, विजय मिळवण्यात भारतीय टीमला अपयश आलं.


न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाचा हा सहावा पराभव आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला नेमक्या कुठल्या कारणांमुळे पराभवाचा सामना करावा लागला त्यावर एक नजर टाकूयात...


कॉलिन मुनरो :


न्यूझीलंडच्या टीमला विजय मिळवून देण्यात सर्वात मोठं योगदान होतं ते म्हणजे कॉलिन मनरो याचं. ओपनर बॅट्समन मार्टिन गप्टिलसोबत त्याने १०५ रन्सची पार्टनरशीप केली. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये आपली दूसरी सेंच्युरी केली. या दोन्ही सेंच्युरी त्याने याच वर्षी लगावले. मनरो याने ५८ बॉल्समध्ये १०९ रन्स बनवले.


भारताची बॉलिंग :


टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमने टीम इंडियाच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. ओपनर बॅट्समन मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मनरो याने जबरदस्त बॅटींग केली. मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, पांड्या, युजवेंद्र चहल यांच्या बॉलिंगवर रन्सचा पाऊस पाडला. 


भारताची बॅटिंग :


विजयासाठी रन्सचा डोंगर असताना टीम इंडिया मैदानात उतरली. मात्र, हा डोंगर सर करताना टीम इंडिया ढासळली. भारतीय टीमकडून सर्वाधिक रन्स विराट कोहलीने केले. मात्र, इतर कुठल्याही बॅट्समनने त्याला साथ दिली नाही. विराटने ४२ बॉल्समध्ये ६५ रन्स केले.