मुंबई : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसरा आणि अंतिम वन डे मॅच कानपूरमध्ये खेळण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडिया आणि टीम न्यूझीलंड कानपूरमध्ये दाखल झाली. इथं भगवं उपरणं देऊन दोन्ही टीमचं स्वागत करण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी खास बनारसहून पान मागवण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरला आल्यानंतर टीम इंडिया आज दाखल झालेल्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा उतरलीय असं नाही... याआधीही अनेकदा ही टीम इथं दाखल झालीय... परंतु, भगवं उपरणं देऊन टीमचं स्वागत मात्र पहिल्यांदाच होतंय. हॉटेल मॅनेजमेंटनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून टीम इंडियाचं असं स्वागत करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं.  


Caption

सीरिजपूर्वी टीम इंडिया न्यूझीलंडला अगदी सहजच धूळ चारेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, मैदानावर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मुंबईमध्ये विराट कोहलीनं आपलं २०० व्या मॅचमध्ये शतक ठोकलं. परंतु, न्यूझीलंडच्या बॅटसमनसमोर विराट कोहलीचं हे शतकंही पाण्यात गेलं. मुंबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात कीवी टीमनं विराट टीमला ६ विकेटनं मात दिली... 


तर, पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये आली आणि न्यूझीलंडला धूळ चारत पुन्हा हिशोब बरोबरीचा केला. 


सीरिजमध्ये सध्या दोन्ही टीम १-१ नं बरोबरीत आहेत. त्यामुळे साहजिकच आता प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्यात त्या कानपूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडे मॅचवर...


आता टीम इंडियाला पाहुणे मंडळींना थोडीही संधी द्यायची नाहीय. याचसाठी विराट अॅन्ड कंपनीनं या मॅचसाठी जोरदार तयारी सुरू केलीय... यासाठी स्वत:ला फिट ठेवणंही महत्त्वाचं आहे. यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांनी जीममध्ये जोरदार मेहनत घेतलीय. 


इंडियन क्रिकेट टीमच्या पेजवर भारतीय टीमचे काही फोटो पोस्ट करण्यात आले. टीम इंडियानं ही सीरिज जिंकली तर ते घरगुती मैदानावर सलग सातवी सीरिज जिंकणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडनं ही सीरिज जिंकली तर ते भारतात चार दशकांनंतर पहिली सीरिज जिंकण्यात यशस्वी ठरतील.