मुंबई : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका (Team India vs New Zealand t 20 Series 2021) खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) या मालिकेसाठी 16 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. यासह टीम इंडियाच्या नव्या टी 20 टीमच्या कॅप्टनचीही घोषणा केली आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) टी 20 टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर रोहित शर्मा कर्णधार झाल्याने केएल राहुलची (K L Rahul) उपकर्णधारपदी निवड केली गेली आहे. (india vs new zeland t 20 series hitman rohit sharma new t 20i captain of team india)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार म्हणून असलेला अनुभव


रोहितने टीम इंडियाची एकूण 19 टी 20 सामन्यात कॅप्ट्न्सी केली आहे. या 19 सामन्यात रोहितने 712 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे.  


17 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात


न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे जयपूर, रांची आणि कोलकातात खेळवण्यात येणार आहेत. 


टी 20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर. 


दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची. 


तिसरा सामना, रविवार, कोलकाता.   


न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.