भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातलाय. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आलाय.
डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातलाय. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आलाय.
खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १७.५ षटकांत २ बाद ६० धावा झाल्यात. मिताली राज ३३ धावांवर खेळतेय तर हरमनप्रीत कौर १० धावांवर खेळतेय.
न्यूझीलंडने या सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील आपले आव्हान कायम टिकवून ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे.