Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेत सुपर 4 मध्ये पाकिस्तानने भारतावर पाच विकेट राखून विजय मिळवला आहे. खराब गोलंदाजीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आशिया कप स्पर्धेत भारताला पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने पाच विकेट राखत विजय मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक 2022 च्या सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 181 धावा केल्या. 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने पाच विकेट गमावल्या. 


बाबर आणि रिझवानने पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. बाबर 14 धावा करून बाद झाला. फखर जमानने 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोहम्मद नवाज झंझावाती खेळी खेळून बाद झाला. त्याने 20 चेंडूत 42 धावा केल्या. मोहम्मद रिझवान ७१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


याआधी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 31 चेंडूत 54 धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा 16 चेंडूत 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल 28 धावा करून बाद झाला. विराट आणि कुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी झाली. 


सूर्यकुमार यादवने 13 धावांचे योगदान दिले. कोहलीने पंतसह चौथ्या विकेटसाठी 25 चेंडूत 35 धावा जोडल्या. ऋषभ पंत खराब शॉटमध्ये 14 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या खाते न उघडताच बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावा केल्या. कोहलीने हुड्डासोबत सहाव्या विकेटसाठी 24 चेंडूत 37 धावांची भागीदारी केली.