India vs Pakistan : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ भरपूर तयारी करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पाकिस्तान संघाचा मास्टर प्लॅन उघड झाला आहे. ही योजना खास भारताविरुद्धच्या सामन्यासाठी बनवण्यात आली आहे. याबाबत खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या योजनेचा खुलासा केला आहे. त्याचे काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  


या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा नवा मॅच फिनिशर आसिफ अलीही या सामन्यासाठी खास तयारी करत आहे. तो शाहिद आफ्रिदीसारखा लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. आसिफ नेटमध्ये दररोज 100-150 षटकार मारत आहे.  


आसिफ नेमकं काय म्हणाला-


असिफ म्हणाला, “मी सरावात दिवसाला 100 ते 150 षटकार मारण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मी एका सामन्यात किमान 3 ते पाच 5 मारू शकेन. ज्या क्षणी मी फलंदाजीला येईन, तेव्हा मला झटपट धावा काढायच्या आहेत. काही वेळा 12 ते 14 धावा प्रति षटक असतात. त्यात खूप दडपण असते. अशा परिस्थितीसाठी मी स्वतःला तयार करत आहे".  


दरम्यान 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला दुबईत खेळवला जाईल. या दोन्ही संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात एकूण तीन संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त क्वालिफायर फेरी जिंकणारा संघ या गटात प्रवेश करेल. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. 


 



आशिया चषकासाठी भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.  


आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.