India vs Pakistan Asia Cup : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; `या` पाच जणांमुळे भारताचा पराभव
आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सध्या सामने सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने पहिल्या पराभवाचा बदला घेऊन टीम इंडियावर विजय मिळवला. पाच विकेट्सने पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला आहे.
India vs Pakistan Asia Cup : आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सध्या सामने सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने पहिल्या पराभवाचा बदला घेऊन टीम इंडियावर विजय मिळवला. पाच विकेट्सने पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला आहे.
60 धावांच्या मदतीने टीम इंडियाने 181 धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवलं. पाकिस्तानने या लक्ष्याचा पाठलाग करत शेवटच्या ओव्हरमध्येच टीम इंडियाचा पराभव केला.
दरम्यान भारताला सामन्यापूर्वीच दुखापतींचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे रोहित शर्माला संघात काही बदल करावे लागले. संघाचा चांगले संतुलून निर्माण करून देणारा रविंद्र जडेजाच बाहेर गेल्याने रोहित शर्मासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आजच्या भारताच्या पराभवाला फक्त टीम कॉम्बिनेशन जबाबदार नाही. त्याला भारताच्या अपयशी मधली फळी, ड्रॉप कॅच, वाईड बॉलर आणि मोहम्मद रिझवान हे फॅक्टर देखील भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
गोलंदाजीत फ्लॉप
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. हार्दिक पांड्याने तिसरा गोलंदाज तयार केला होता. पण टीम इंडियाची हीच सर्वात मोठी कमजोरी ठरली. यावेळी पांड्या बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये अपयशी ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या. त्या बदल्यात त्याने केवळ एक विकेट काढली. भुवीनेही 40 धावा दिल्या. ज्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला आहे.
फलंदाजीत योगदान देऊ शकले नाही
रोहित आणि के एल राहुलच्या भागीदारीने टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली खरी पण त्यावर मिडल ऑर्डरने विरजण घातलं. मिडल ऑर्डरवर खेळणाऱ्या एकानेही तेवढा चांगला सपोर्ट केला नाही. त्यामुळे टीम इंडियाला 181 धावांवर समाधान मानावं लागलं. सूर्यकुमार यादव 13, पंत 14 पांड्या शून्य तर हुड्डाने जेमतेम 16 धावा काढल्या. या सामन्यात खूप छोट्या चुका केल्या ज्यामुळे सामना हातून गमवण्याची वेळी खेळाडूंवर आली. चहल पूर्ण आऊट ऑफ फॉर्म होता. तर अर्शदीपने आसिफ अलीचा सोपा कॅच सोडल्याने पाकिस्तानला त्याचा फायदा झाला.
वाचा : आज गौरी-गणपती विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त
शेवटच्या सामन्याचा हिरो
आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्याने भारतीय संघाला स्वबळावर विजय मिळवून दिला होता. त्यानंतर 33 धावा करण्यासोबतच त्याने तीन महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या. मात्र एका सामन्यानंतर तो भारतीय संघासाठी सर्वात मोठा zero ठरला आहे. अशा स्थितीत आता पुढील सामन्यात त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
टीम इंडियाला आता आपले पुढील दोन सामने अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहेत. अंतिम फेरीत जाण्यासाठी टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर टीम इंडिया अंतिम फेरीत जाऊ शकत नाही. \