मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा मैदानात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार लवकरच भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 सीरिज खेळली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात ICCच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असून या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमधील जंग वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देश यावर्षी टी -20 सामन्यांची एक छोटी मालिका खेळू शकतात. 


पाकिस्तानने आपल्या शेजारी देशाबरोबर द्विपक्षीय मालिका खेळण्याचा विचार केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अधिकाऱ्यांनी या विषयावर पहिल्यांदा मिठाची गुळणी केली. पण नंतर या अधिकाऱ्यानं मालिका खेळवण्याबाबत विचार सुरू असल्याचं सांगितलं. 


2012-13मध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघ भारतात आला होता. आता जर दोन्ही देशांमध्ये टी 20 सीरिज खेळवण्यात आली तर भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट बोर्डानं अद्याप कोणतीही चर्चा केली नसल्याचंही पीसीबीच्या चेअरमनने माहिती दिली आहे. 


2012-13नंतर भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये कोणतीही मालिका खेळण्यात आली नाही. त्यामुळे ही टी 20 सीरिज 8 वर्षांनी खेळवली जाणार असल्याची चर्चा आहे. ICC या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाचच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे.