T20 World Cup 2022 India Vs Pakistan Sachin Tendulkar On Virat Kohli: भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानातील युद्धच असतं. मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर एक दबाव असतो. त्यात सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सांगायलाच नको. शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव घेतली आणि विजय खेचून आणला. असं असलं तरी या विजयाचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जातं. विराट कोहलीने (Virat Kohli) 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. 19 व्या षटकात विराटच्या आक्रमक खेळीमुळे भारताला विजय सोपा झाला. हारिस रौफच्या गोलंदाजीवर शेवटच्या दोन चेंडूवर विराटने दोन उतुंग षटकार ठोकले. पाचव्या चेंडूवर ठोकलेल्या षटकाराचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कौतुक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विराट कोहली, निःसंशयपणे ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे आनंददायक होते, रौफविरुद्ध 19व्या षटकात लाँग ऑनवर बॅकफूटवर मारलेला षटकार नेत्रदीपक होता! असंच खेळत राहा.", असं ट्वीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलं आहे. 



India vs Pakistan: "हार्दिक मला बोलला, फक्त..." विराट कोहलीनं सांगितलं शेवटच्या षटकातील प्लानिंग


"माझ्याकडे शब्द नाहीत. हे कसे घडले याची मला कल्पना नाही. हार्दिक मला बोलला, फक्त विश्वास ठेवं की आपण शेवटपर्यंत लढू. मी हार्दिकला सांगितले की आपल्याला या ओव्हरमध्ये जास्त रन्स काढायच्या आहेत आणि झालंही तसंच. हिशोब अगदी सोपा होता.", असं विजयानंतर विराट कोहलीने सांगितलं.