India Vs Pakistan : टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. भारतानं असं करावं, पाकिस्तान कुठे चुकेल असे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यातच आता म्हणजे Team India चे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. थोडक्यात या शेजारी राष्ट्राच्या खेळाडूंवर प्रचंड दडपम आहेत. पाकिस्तानच्या कर्णधाराची एक कृतीत हे अगदी स्पष्टपणे सांगत आहे. (india vs pakistan live babar azam worried spend 45 minutes in nets to make special preperation for mohammad shami T20 world cup 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉर्ट बॉलवर खेळण्याची स्वत:चीच पद्धत पाहून पाकचा खेळाडू, कर्णधार बाबर आझम (babar azam ) आता आपल्या या कमतरतेवर काम करताना दिसत आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (mohammad shami ) पुन्हा एकदा लयबद्ध खेळ दाखवू लागल्यामुळे आझम चिंतेत आहे. कारण, शमीचा शॉर्ट बॉल डावलणं त्यालाही जमलेलं नाही. 


अधिक वाचा : T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अशी असेल प्लेईंग इलेव्हन


 


क्रिकेट अभ्यासकांच्या मते शमी Powerplay मध्ये गोलंदाजीसाठी उतरु शकते. परिमामी आझमच त्याच्या गोलंदाजीच्या माऱ्याला सामोरा जाणार आहे. ज्यामुळं तो आपल्या फलंदाजीमध्ये कोणतीही उणीव ठेवू इच्छित नाही. 


शॉर्ट बॉलवर खेळताना येणाऱ्या अपयशाचा उल्लेख अनेकांनीच केल्यामुळे आता आझमनं त्यावर Gabba नेट्समध्ये 45 मिनिटं सराव करत घाम गाळला आणि शक्य तितकं चांगलं प्रदर्शन करण्यासाठी मेहनत घेतली. 




शमीची गोलंदाजी पाहणं म्हणजे पर्वणी... 
6 पैकी 3 चेंडू यॉर्कर टाकणारा शमी खेळाडूची परिस्थिती पाहून योग्य वेळी शॉर्ट बॉलचा मारा करतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींना त्याची गोलंदाजी पाहणं, म्हणजे जणू एक पर्वणीच. त्याच्या याच Attack विषयी पाकिस्तानच्या संघातील फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यानं आझमशी चर्चा करत काही आवश्यक ठिकाणी त्याला मदत दिल्याचंही पाहायला मिळालं.