T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने (India Vs Pakistan) चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार दिसून आली. अर्शदीप आणि हार्दिक पांड्याच्या (Arshdeep and Hardik) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता भारताची फलंदाजी ढासळली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली. सलामीवीर KL Rahul आणि कॅप्टन Rohit Sharma झटपट बाद झाले. Naseem Shah ने KL Rahul ला फक्त 4 धावांवर असताना बाद केलं. भारताला पहिला झटका बसल्यानंतर Virat Kohli मैदानात आला. 


आणखी वाचा - India Vs Pakistan सामन्यात एवढी 'मोठी चूक', रोहित पांड्याला संताप अनावर, पाहा नेमकं काय झालं?


कोहलीने रोहितसोबत भागेदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  Haris Rauf च्या एका बॉलवर रोहित आपली विकेट गमावून बसला. 4 थ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर रोहितची विकेट पडली. एका इनस्विंग बॉल खेळण्याचा प्रयत्नात रोहित Iftikhar कडे बॉल सोपवून बसला.


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, स्लिपने थांबलेल्या Iftikhar ने बॉल झेप घेत पकडला. त्यावेळी बॉल ग्राऊंडला टच झाल्याचं भास झाल्याने अनेकांनी रोहितच्या विकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर रोहित आऊट कि नॉट आऊट असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.