IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान म्हटलं की सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो. चाहते नेहमीच भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच 2023 च्या विश्वचषकात (World Cup 2023) दोन्ही संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला होता. या स्पर्धेदरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता चाहत्यांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल... कसं ते पाहा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील महिन्यात होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत (Under 19 Asia Cup) भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 10 डिसेंबर रोजी दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 स्टेडियमवर होणार आहे. त्याच वेळी, ही स्पर्धा 8 डिसेंबरपासून सुरू होईल. अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याचं वेळापत्रक देखील आता समोर आलंय.


कसं असेल टीम इंडियाचं वेळापत्रक


८ डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
10 डिसेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान 
१२ डिसेंबर – भारत विरुद्ध नेपाळ 
15 डिसेंबर - दोन्ही उपांत्य फेरीचे सामने
17 डिसेंबर - अंतिम सामना



अंडर-19 आशिया कपमध्ये टीम इंडिया डिफेन्डिंग चॅम्पियन आहे. तसेच टीम इंडिया अंडर-19 आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने या स्पर्धेचे जेतेपद 8 वेळा जिंकले आहे. 2021 मध्ये शेवटच्या वेळी टीम इंडियाने श्रीलंकेला हरवून ट्रॉफी जिंकली होती.  त्यामुळे यंदा देखील टीम इंडिया विजयावर शिक्कामोर्तब करेल, अशीच अपेक्षा आहे.