IND vs SA 1st T20I : पहिल्याच सामन्यात पावसाचा खोडा; टॉसविना सामना रद्द, मालिकेची रंगत वाढली!
South Africa vs India 1st T20I : मालिकेतील पहिला सामन्यावर पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात आल्याची वेळ आली आहे.
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात आल्याची वेळ आली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपनंतरच्या सर्वात रोमांचक सिरीजमध्ये चाहत्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आता आगामी दोन्ही सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. आगामी सामना पोर्ट एलिजाबेथ येथे 12 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
अंदाज ठरला खरा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान वेबसाइटने दिलेल्या Accuweather नुसार पावसाची शक्यता 60 टक्के सांगण्यात आली होती. पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, संपूर्ण सामनाच पावसामुळे धुवून निघाला आहे.
टी-ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक
10 डिसेंबर - पहिला टी20 सामना, डरबन
12 डिसेंबर, दूसरा टी20 सामना, पोर्ट एलिजाबेथ
14 डिसेंबर, तीसरा टी20 सामना, जोहानसबर्ग
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.