भारत-दक्षिण आफ्रिका आज दुसरा टी-२० क्रिकेट सामना
भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेतील दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज रंगणार आहे.
केप टाऊन : भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेतील दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज रंगणार आहे.
मालिकेतील पहिली लढत जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आता वन-डे मालिकेपाठोपाठ टी-२० मालिका जिंकण्याचीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला संधी आहे.
दुसरीकडे, यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.