सेंच्युरियन : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका टेस्ट क्रिकेट मालिकेचा आज (रविवार, १४ जानेवारी) दुसरा दिवस. दिवसाअखेर खेळ थांबला तेव्हा ५ गडी बाद १८३ धावा, कर्णधार विराट कोहली ८५ वर नाबाद अशी भारताची स्थिती राहील. इतक्या मोठ्या प्रमाणात गडी बाद झाल्यामुळे सहाजीकच भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या आहेत. आता तिसऱ्या दिवशी विराट काय कशी कामगिरी करतो यावर भारताचे भवितव्य ठरू शकते.


भारताची सुरूवात अगदीच वाईट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेला ३३५ धावांवर थांबवल्यावर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात अगदीच वाईट झाली. शिखर धवनला संघाबाहेर ठेऊन संघात प्रवेश दिलेल्या लोकेश राहुल केवळ दहा धावा काढून बाद झाला. दक्षिण अफ्रिकेचा वेगवागन गोलंदाज मोर्ने मार्केल याने त्याला बाद केले.  राहुल बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या केवळ २८ इतकी होती. दरम्यान, चेतेश्वर पुजाराचे मैदानावर आगमन झाले. मात्र, आपली खेळी दाखविण्याआधीच तो बाद झाला. त्याला विशेष कामगिरी दाखवता आली नाही.


सुरूवातीलाच दोन मोठे धक्के


सुरूवातीलाच दोन मोठे झटके बसल्यामुले भारतीय संघ काहीसा बचावात्मक पवित्र्यात गेला. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहलीने संघाला सूर मिळवून दिला. मुरली विजयसोबत त्याने चांगली भागिदारी केली. १०७ धावांवर तिसरा गडी बाद झाल्यावर भारतीय संघ आता धावसंख्या वाढवताना दिसत आहे. मात्र, मध्येच मुरली विजय बाद झाल्यामुळे पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्या उभारणीला खिळ बसली आहे. मुरली नंतर मैदानात आलेल्या रोहित शर्मानेही १० धावा करत तंबू गाठला. त्यामुळे १३२ धावा ४ गडी बाद अशा स्थितीत भारतीय संघ आला. त्यामुळे पुन्हा एकदा भारताला बचावात्मक खेळी करावी लागण्याची शक्यात आहे.


विराट करणार 'हार्दिक' विजय?


दरम्यान, यष्टीरक्षक पार्थिव पटेलने काही चांगले फटके मारायचा प्रयत्न केला मात्र, तोही १९ धावा काढून तंबूत परताल. त्यानंतर आजघडीला आकर्षण ठरलेला हार्दिक पंड्या ११ धावांवर खेळतो आहे. ८५ धावांवर खेळणाऱ्या कोहलीला तो चांगली साथ देईल अशी आशा आहे.