ऐतिहासिक मालिका विजय करण्याचं भारताचं स्वप्न भंगल
ऐतिहासिक मालिका विजय करण्याचं भारताचं स्वप्न भंगल आहे.
मुंबई : ऐतिहासिक मालिका विजय करण्याचं भारताचं स्वप्न भंगल आहे.
सलग चौथ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ऐतिहासिक मालिका विजय करण्याचं भारताचं स्वप्न पावसामुळे भंगलं. चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला.
पावसामुळे विजय हुकला
यामुळे शिखर धवनच्या शतकाचाही आनंद हिरावला गेला. भारताने ७ गडी गमवत ५० षटकांत दक्षिण आफ्रिकेसमोर २८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण सामन्यादरम्यान सलग दोन तास पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला २८ षटकांत २०२ धावांचं लक्ष्य दिलं गेलं. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य ५ गडी गमवत पूर्ण केलं. क्लासनने नाबद ४३ धावांची खेळी केली. तर मिलर ३९ धावांवर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेचा वन डे मालिकेतील पहिला विजय
दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेतला हा पहिला विजय. सहा एक वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत ३-१ ने आघाडीवर आहे. मिलर आणि क्लासेन यांनी तुफान फटकेबाजी करत आफ्रिकेला विजयश्री मिळवून दिली.