विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ३९/३ असा झाला होता. आर. अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या २ विकेट तर रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. दिवसाअखेर टेंबा बऊमा २ रनवर आणि डीन एल्गार २७ रनवर नाबाद खेळत आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ४६३ रननी पिछाडीवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी टीम इंडियाने ५०२/७ वर आपला डाव घोषित केला. मयंक अग्रवालने सर्वाधिक २१५ रनची खेळी केली. मयंकचं टेस्ट कारकिर्दीतलं हे पहिलंच द्विशतक आणि शतकही होतं. भारतामध्ये पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या अग्रवालने द्विशतक करण्याचं रेकॉर्ड केलं आहे. याआधी फक्त सेहवागच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक करणारा भारतीय होता.


मयंक अग्रवालबरोबरच टेस्टमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग कऱणाऱ्या रोहित शर्मानेही या मॅचमध्ये शतक झळकावलं. १७६ रन करून रोहित शर्मा आऊट झाला. रोहित आणि मयंक यांच्यात ओपनिंगसाठी ३१७ रनची पार्टनरशीप झाली. रोहित आणि मयंक वगळता इतर कोणत्याच भारतीयाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रवींद्र जडेजा ३० रनवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजला सर्वाधिक ३ विकेट मिळाल्या. तर वर्नन फिलंडर, डेन पिडट, मुथुस्वामी आणि डीन एल्गारला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.