India Vs South Africa 1st One Day Match: पावसाच्या व्यत्ययानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उशिराने सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या जानेमन मलान आणि क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 49 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलनं झेल सोडला. संघाचं आठवं षटक कर्णधार शिखर धवननं शार्दुल ठाकुरच्या हाती सोपवलं. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जानेमन मलानची कट स्लीपला उभ्या असलेल्या शुबमन गिलच्या हाती गेली. मात्र त्याला हा झेल पकडता आला नाही आणि जीवदान मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार शिखर धवननं संघाचं 13 षटक पुन्हा एकदा शार्दुल ठाकुरच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच जानेमन मलानला बाद करण्यात शार्दुल ठाकुरला यश आलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर श्रेयर अय्यरनं झेलं घेतला. जानेमन मलाननं 42 चेंडूत 22 धावा केल्या. यात 3 चौकारांचा समावेश आहे.




दक्षिण आफ्रिका संघ: जानेमन मलान, क्विंटन डिकॉक, टेम्बा बावुमा, एडन मार्कम, हेन्रिच क्लासेन, डेविड मिलार, वायन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, टबरेज शम्सी


भारत संघ- शिखर धवन, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशान, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रवि बिष्णोई, मोहम्मद सिराज, आवेश खान