मुंबई : आयपीएल संपल्यानंतर टी 20 आंतरराष्ट्रीय सीरिज होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना 9 जून ते 19 जून होणार आहे. टी 20 सीरिजसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी नक्की कोणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीरिजमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा सारख्या दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. या सीरिजआधी आकाश चोप्राने संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडलं आहे. 


टी 20 सीरिजसाठी दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर टी 20 सीरिजमध्ये के एल राहुल टीमचं नेतृत्व करणार आहे. दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याला टीममध्ये खेळण्य़ाची संधी मिळणार आहे. 


या दिग्गज प्लेइंग इलेव्हन


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून सामना सुरू होणार आहे. या सामन्यात प्लेइंग इलेव्हन आकाश चोप्राने निवडली आहे. भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियाचा ओपनर आकाश चोप्राने प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिकला निवडलं नाही. आकाश चोप्राने


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सामन्यासाठी आकाश चोप्राने निवडलं Playing 11


1. केएल राहुल (कर्णधार) 2. ऋतुराज गायकवाड 3. श्रेयस अय्यर 4. दीपक हुड्डा 5. ऋषभ पंत 6. हार्दिक पांड्या 7. अक्षर पटेल 8. भुवनेश्वर कुमार 9. हर्षल पेटल 10. उमरान मलिक 11. आवेश खान