मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर आफ्रिकेने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतलीय.टीम इंडियाला जर मालिका जिंकायची असेल तर पुढील तीनही सामने जिंकणे गरजेचे आहे. अशात आता टीम इंडियात या खेळाडूला संधी द्यावी अशी मागणी चाहते करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने चांगली फलंदाजी केली होती. मात्र तरीही टीम इंडियाचा पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी अपयशी ठरताना दिसली. निव्वळ 149 धावाच टीम इंडियाला करता आली होती. भुवनेश्वरला सोडून एकही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी न करता आल्याने टीम इंडियाचा पराभव झाला. बॅटींग आणि बॉलिंगमध्ये टीम इंडिया कमकूवत दिसतेय. 


सलग दुसऱ्या पराभवानंतर आता संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यातच चाहतेही चांगलेच संतापले आहेत.  चाहत्यांनी संजू सॅमसनला संघात खेळवण्याची मागणी होतेय. अनेक चाहते संजूच्या नावावर शिक्कामोर्तब करत आहेत. आयपीएलमध्ये संजूने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे चाहते त्याच्या नावाची मागणी करतायत.  ऋषभ पंतऐवजी संजू सॅमसनचा संघात समावेश करावा, असे अनेक यूजर्सने लिहिले आहे.


संजू सॅमसनची IPL कामगिरी
संजू सॅमसनने IPL 2022 मध्ये अप्रतिम खेळ दाखवला, पण तरीही त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. संजूने आयपीएल 2022 च्या 17 सामन्यात 458 धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वांनाच वेड लावले आहे.


भारतीय संघाला मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता मालिकेत टिकायचे असेल तर टीम इंडियाला तिसरा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. अन्यथा टीम इंडिया मालिका गमावेल.