IND vs SA : पंतसोबतच टीम इंडियालाही जाणवतेय `या` स्टार खेळाडूची उणीव
या दिग्गज खेळाडूशिवाय टीम इंडिया दुसरा टी 20 सामना जिंकण्यात यशस्वी ठरेल? मांडा तुमचं मत
मुंबई : टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे आल्यानंतर रोहित शर्माने एकामागे एक सीरिज जिंकण्याचा सपाटाच लावला होता. मात्र आता याला ब्रेक लागला आहे. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी ब्रेक देण्यात आला. तर कर्णधारपदाची धुरा तात्पुरती ऋषभ पंतकडे देण्यात आली.
ऋषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 7 विकेट्सने गमवला. या लाजीरवाण्या पराभवानंतर आता सगळेजण स्टार खेळाडू आणि कर्णधार रोहित शर्माला मिस करत आहेत. रोहित शर्माशिवाय ही सीरिज जिंकणं पंतसमोर एक मोठं आव्हान आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाची या सीरिजमध्ये मोठी कमतरता जाणवत आहे. रोहित शर्माशिवाय टीम इंडिया कोणताही सामना जिंकू शकली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही टीम इंडियाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्याकडे सर्वांची नजर असणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाने यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 11 सामने खेळले, या सर्व सामन्यांमध्ये टीमने विजय मिळवला. टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली दोन कसोटी सामने, 3 वनडे आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत.
रोहित व्यतिरिक्त, विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी उर्वरित 7 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत ऋषभ पंतकडे संघाची कमान आहे. पंत (ऋषभ पंत) पहिल्यांदाच टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारत आहे. तो कर्णधार म्हणून पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. दोन्ही संघांमधील दुसरा सामना रविवारी कटक येथे होणार आहे. ऋषभ पंतला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.