मुंबई: टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला स्वत:ची कामगिरी सिद्ध करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणेकडून कसोटीचं उपकर्णधारपद काढून घेतलं आहे. तर सतत खराब फॉर्ममध्ये खेळणाऱ्या पुजाराला ही शेवटची संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. तर पुढच्या सामन्यात किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पुन्हा संधी देण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. 


चेतेश्वर पुजारा सातत्याने निराशाजनक कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून तो प्रयत्न करुनही पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतू शकत नाहीय. त्यामुळे टीम इंडियालाही मोठं नुकसान होत आहे. 


चेतेश्वर पुजारा पिचवर येताच पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानातून परत माघारी जावं लागलं. पुजारा प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट बसत नसल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून तो बाहेर जाण्याची शक्यता आहे. 


चेतेश्वर पुजारा ऐवजी हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते. तिसऱ्या क्रमांकावर पुजारा ऐवजी विहारीला खेळण्याची संधी विराट कोहली देऊ शकतो. 27 वर्षांच्या हनुमा विहारीनं 12 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 624 धावा केल्या आहेत. 


पुजाराचा खराब फॉर्म पाहता आता हनुमाला संघात खेळण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यातील प्लेइंद इलेव्हन कसं असणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.