केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ आजपासून सुरू होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे. पहिला सामना न्यू वॉडरर्स स्टेडियमवर रंगणार आहे.


कोहली जबरदस्त फॉर्मात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने वनडे मालिकेत साडे पाचेशेहून अधिक धावा केल्यात. त्याचबरोबर या मालिकेत सुरेश रैनाच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. तो वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन करतोय. तर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकीपटूंची जोडी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची परीक्षा घेण्यास सज्ज आहे.


दक्षिण आफ्रिकेची कसोटी


दुसरीकडे ड्युमिनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. दक्षिण आफ्रिकेची भिस्त ड्युमिनीसह डिव्हिलियर्स, डेव्हिड मिलर, मॉरिस यांच्यावर असणार आहे.