कोलंबो : टीम इंडियाने (Team India) पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले  263 धावांचे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार शिखर धवनने नाबाद 86 धावा केल्या. पण खरा हिरो ठरला तो बर्थ डे बॉय (Ishan Kishan) इशान किशन. इशान किशनचा ही डेब्यू मॅच होती. त्याने या पदार्पणातील सामन्यात तडाखेदार सुरुवात केली. इशानने टी 20 प्रमाणे वनडे डेब्यूत अर्धशतकी खेळी करण्याचा कारनामा केला. (india vs sri lanka 1st odi Ishan Kishan become 2nd batsman after Rassie van der Dussen who scored half century in debut odi and t20i)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या रासी वान डेर डुसेननंतर (Rassie van der Dussen) इशान   दोन्ही प्रकारातील पहिल्या सामन्यात अर्धशतक लगावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. इशानने इंग्लंड विरुद्ध टी 20 पदार्पणात हाफ सेंच्युरी ठोकली होती.



इशानची आक्रमक सुरुवात


इशानने आपल्या वनडे कारकिर्दीची आक्रमक सुरुवात केली. त्याने  पहिल्या चेंडूवर फोर तर दुसऱ्या चेंडूवर सिक्स ठोकला. इशानने या इनिंगमध्ये 42 चेंडूत  8 फोर आणि 2 कडकडीत सिक्ससह 59 धावांची खेळी केली. 


मालिकेत 1-0 आघाडी


दरम्यान या विजयासह टीम इंडियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत  1-0 ने आघाडी घेतली आहे. या सीरिजमधील दुसरा सामना हा 20 जुलैला आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी लंकन टीमसाठी दुसरा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. तर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे.