मुंबई : India vs Sri Lanka T20: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंत आणि हार्दिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण जाणार यावरुन ही तू-तू, मी-मी झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ( India vs Sri Lanka, Asia Cup 2022) रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आशिया चषक 2022 च्या सुपर 4 मध्ये (Asia Cup 2022) सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाला आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात टीम इंडिया बॅकफूटवर दिसली.तर ड्रेसिंग रुमचे वातावरणही संपूर्ण सामन्यात गोंधळलेले दिसले. अशा परिस्थितीत ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya ) ड्रेसिंग रुममधून जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे टीम इंडियातील अंतर्गत वाद पुढे आला आहे.


पंत आणि हार्दिकचा व्हिडिओ व्हायरल  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत आणि पंड्या दोघेही एकाच जागी बसले होते आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव आऊट झाला. सहसा फलंदाज बाद झाल्यावर पुढे कोण येणार, हे आधीच ठरवले जाते. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंतला फलंदाजीला यावे लागले असले तरी रोहित शर्मा याने अचानक हार्दिक पांड्या याला फलंदाजीसाठी पाठवले.


दोघांमध्ये तू-तू, मै मै


रोहित  शर्मा याच्या या निर्णयानंतर वातावरण थोडे तापले. कोण फलंदाजी करणार हे दोन्ही फलंदाजांना समजत नव्हते. प्रत्यक्षात कोण फलंदाजीला उतरेल असा प्रश्न दोन्ही फलंदाजांना पडलेला दिसत होता. त्यानंतर रोहितचे हावभाव पाहून हार्दिक फलंदाजीला आला. पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल हे दोन्ही फलंदाजांना समजत नव्हते. टीम इंडियाची मिडल ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याचे दिसून आले. 



टीम इंडियाचा दोनदा पराभव


टीम इंडिया आशिया कप 2022 मधून जवळपास बाहेर पडली आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅच जिंकल्या होत्या, पण सुपर-4 मध्ये ते पूर्णपणे अपयशी ठरले होते. आशिया कप 2022 च्या सुपर-4 मध्ये टीम इंडियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम पाकिस्तानने भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर आता श्रीलंकेनेही टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव करून अडचणी निर्माण केल्या आहेत.