PAK vs SL Asia Cup 2023 : एशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने (Sri Lanka) धडक मारली आहे.  जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात श्रीलंकनेने पाकिस्तानचा (Sri Lanka beat Pakistan) पराभव केला. आता येत्या रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि  श्रीलंकेमध्ये एशिया कपची फायनल (Asia Cup Final) रंगणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता अंतिम सामना खेळवला जाणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेटने विजय मिळवला. या पराभवामुळे पाकिस्तानचं एशिया कपच्या फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न धुळिस मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रीलंकेने आठ विकेटच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर हे आव्हान पार करत रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाबरोबरच श्रीलंकेने फायनलमध्ये धडक मारली आहे. लंकेने अकराव्यांदा एशिया कपच्या फायलनमध्ये प्रवेश केला आहे. एशिया कपच्या इतिहासत भारत आणि श्रीलंका तब्बल 8 वेळा अंतिम सामन्यात आमने सामने आले आहेत. 


पाक-लंका चुरशीचा सामना
पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानचा सुपर-4 मधला सामना जबरदस्त चुरशीचा झाला. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना उशीरा सुरु झाला प्रत्येकी 42 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाला. सामन्याच्या पाचव्याच षटकात पाकिस्तानाच सलामीचा फलंदाज फखार झमान बाद झाला. प्रमोद मदुशनने त्याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर आलेला कर्णधार बाबर आझमही फार काळ मैदानावर टीकला नाही. लंकेचा स्टार फिरकी गोलंदाजत वेलालागने 29 धावांवर बाबर आझमला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. 


अब्दुल्ला शफीकने झुंजार 50 धावा केला. पण 52 धावांवर तोही बाद झाला. त्यानंतर आलेले मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझही झटपट बाद झाले. 130 धावांवर पाच विकेट अशी पाकिस्तानची अवस्था झाली. दोनशेच्या आतच पाकिस्तानचा खेळ खल्लास होणार असं वाटत असतानाच मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमदने सामन्याची सर्व सू्त्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी तुफान फटकेबाजी करत लंकेच्या गोलंदाजांची हवा काढली. मोहम्मद रिझवानने नाबाद 86 धावा केल्या. तर इफ्तिकारने 47 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानने 42 षटकात 7 विकेट गमावत 252 धावा केल्या.


श्रीलंकेतर्फे पथिरानान सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर प्रमोद मदुशनने दोन विकेट घेतल्या. 


विजयासाठी 252 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या श्रीलंकेने दमदार सुरुवात केली.  निसांका आणि परेराने पहिल्या षटकापासून आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. पण परेरा 17 धावांवर बाद झाला. तर दमदार फलंदाजी करणारा निसांकाही शादाबच्या गोलंदाजीवर आऊट झाला. पण त्यानंतर कुसाल मेंडिस आणि समरविक्रमाने डाव सावरला. या दोघांनी शंभर धावांची पार्टनरशीप केली. पण त्यानंतर लगचेच समरविक्रमे 48 धावांवर बाद झाला. तर कुसाल मेंडिस 91 धावांवर बाद झाला आणि पुन्हा सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला. त्यातच शाहिन आफ्रिदीने 41 व्या षटकात सलग दोन विकेट घेत लंकेला मोठा धक्का दिला. पण शेवटच्या षटकात असलंकाने बाजी फिरवली आणि श्रीलंकेला शानदार विजय मिळवून दिला.