धर्मशाला : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होणार आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे.


कोणाचं पारडं भारी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही संघांमध्ये वनडे हिस्ट्रीमध्ये 17 बाइलेटरल सीरीज झाल्या आहेत. ज्यामध्ये भारताने 12 तर श्रीलंकेने फक्त 2 सिरीज जिंकल्या आहेत. तर 3 सिरीज ड्रॉ झाल्या आहेत.


वनडे हिस्ट्री


भारतामध्ये दोन्ही संघामध्ये 9 सीरीज झाल्या आहेत. ज्यामध्य़े भारताने 8 सिरीज जिंकल्या आहेत तर एक ड्रॉ ठरली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे हिस्ट्रीमध्ये एकूण 155 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 88 तर श्रीलंकेने 55 सामने जिंकले आहेत. एक मॅच टाय झाली तर 11 सामन्यांचा कोणताची निकाल नाही आला.


धर्मशालाचा इतिहास


धर्मशालामध्ये सर्वात मोठा स्कोर 330 रन्सचा आहे. जो भारताने 2014 मध्ये विंडिज विरोधात बनवला गेला होता. या मैदानात खेळाडुचा सर्वात जास्त स्कोर 127 रन आहे. जो विराट कोहलीने विंडिज विरोधात केला होता.