कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. तीन टेस्ट मॅचची ही सीरिज भारत ३-०नं जिंकला तर कॅप्टन विराट कोहली सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडू शकतो. ही सीरिज भारत ३-०नं जिंकला तर कोहली सर्वाधिक टेस्ट जिंकणारा दुसरा भारतीय कॅप्टन बनेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कॅप्टन आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं ६० टेस्ट मॅचमध्ये २७ विजय मिळवले आहेत. तर गांगुलीच्या नेतृत्वात भारताला ४९ मॅचमध्ये २१ विजय मिळाले. कोहलीच्या नेतृत्वात भारतानं आत्तापर्यंत २९ टेस्टपैकी १९ टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज भारत ३-०नं जिंकला तर कोहलीच्या खात्यात २२ विजय होतील आणि तो गांगुलीचं रेकॉर्ड तोडेल.


जिंकण्याच्या टक्केवारीवर नजर टाकली तर ६५.५१ टक्क्यांसह विराट कोहली यशस्वी भारतीय कॅप्टनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वात लागोपाठ ८ टेस्ट सीरिज जिंकल्या आहेत. २०१५मध्ये भारतानं श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीत २-१नं हरवलं. त्यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.


भारताचे यशस्वी कॅप्टन


एम.एस.धोनी- ६० मॅचमध्ये २७ विजय, १८ पराभव


सौरव गांगुली- ४९ मॅचमध्ये २१ विजय, १३ पराभव


विराट कोहली- २९ मॅचमध्ये १९ विजय, ३ पराभव


मोहम्मद अजहरुद्दीन- ४७ मॅचमध्ये १४ विजय, १४ पराभव


सुनील गावसकर- ४७ मॅचमध्ये ९ विजय, ८ पराभव


मन्सुर अली खान पतौडी- ४० मॅचमध्ये ९ विजय, १९ पराभव