Ind vs Sl 2nd T20 : भारत आणि श्रीलंकेमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला फलंदाजी करण्यासाठी आमंंत्रित केलं होतं. निर्धारित 20 षटकात श्रीलंकेने भारताला 207 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून शनाका 56 आणि कुसल मेंडिस 52 धावांची वादळी खेळी करत अर्धशतक केलं. भारताला विजयासाठी 207 धावांचा आव्हान आहे. (IND vs SL 2nd T20, IND vs SL 2nd T20 Live, ind vs sl live score, sport marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचे सलामीवीर पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी आक्रमक सुरूवात केली. पॉवर प्लेमध्ये दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांना फोडून काढत 55 धावा केल्या. चहलने पहिला बळी घेत खतरनाक कुसल मेंडिसला माघारी धाडलं. मेंडिसने 31 चेंडूत 51 धावा केल्या. मेंडिस बाद झाल्यावर उमरानने भानुका राजपक्षेला 2 धावांवर बोल्ड आऊट केलं. 


भानुका गेल्यावर आलेल्या असालंकाने धुरा आपल्या हाती घेत मोठे फटके खेळले. 19 चेंडूत 37 धावांची आक्रमक खेळी केली. एकदा उमरान मलिकने असालंका कॅच आऊट केलं. त्यानंतर आलेल्या हसरंगाला क्लीन बोल्ड करत उमरानने 3 विकेट्स घेतल्या. शनाकाने शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमक फलंदाजी केली. 22 चेंडूत त्याने 56 धावांची वादळी खेळी केली. 


भारताच्या गोलंदाजांची पिसे काढलीत. उमरान मलिकला 48 तर शिवम मावीला 53 धावा चोपल्या. उमरानने 3, अक्षर पटेलने 2 आणि चहलने 1 विकेट घेतली. 


India Playing XI : इशान किशन (w), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (C), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल 


 Sri Lanka Playing XI : पथुम निसांका, कुसल मेंडिस (w), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (C), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून राजीथा, दिलशान मदुस