मुंबई : भारतीय क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. पाच वनडे आणि एका टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये पहिल्या दोन वनडे झाल्या आहेत. यातली पहिली वनडे पावसामुळे होऊ शकली नाही तर दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं १०५ रन्सनी विजय मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तिसरी वनडे ३० जूनला ऍंटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये होणार आहे. पण यासगळ्या दौऱ्यावेळी भारतीय खेळाडू कॅरेबियन बेटांवर भरपूर मजा मस्ती करत आहेत.


कॅरेबियन दौऱ्यावर अनेक क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासोबत गेले आहेत. या दौऱ्यामध्ये धोनीची मुलगी झिवा आणि धवनचा मुलगा झोरावरही त्यांच्यासोबत आहेत. झिवा आणि झोरावरचे मस्ती करतानाचे फोटो भारतीय क्रिकेटपटूंनी शेअर केले आहेत. धवनचा मुलगा आणि ब्राव्होच्या मुलाचा फोटो धोनीची पत्नी साक्षीनं शेअर केला आहे.