मुंबई : भारत आणि विंडीजमधील चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर सोमवारी रंगणार आहे. या सामन्यात विराट शतकांचा चौकार मारणार का? याकडेच क्रिकेट चाहत्याचं लक्ष असेल. त्याचप्रमाणे दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि विंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका कर्णधार विराट कोहलीच्या शतकांच्या धडाक्यानं गाजतेय. त्याला रोखणं कॅरेबियन संघाला जमलेलचं नाही. आता चौथ्या एकदिवसीय मालिकेत विराटला आणखी एक शतक झळकावण्याची नामी संधी आहे. कोहलीनं विंडीज गोलंदाजांची अक्षरक्ष: धुलाई केली. त्यामुळे जेसन होल्डरच्या संघासमोर कोहलीला रोखण्याचं मोठ आव्हान आहे.


पुणे एकदिवसीय सामना जिंकत विंडीजनं पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ नं बरोबरीत साधलीय. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला आपल्या खेळात आणखी सुधारणा करावी लागेल. कोहली वगळता एकाही फलंदाजाला या सामन्यात छाप सोडती आली नव्हती. त्यामुळे फलंदाजांनाही आपली कामगिरी उंचवावी लागेल.


तिन्ही सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी खोऱ्यानं धावा दिल्यात. भारतीय आणि विंडीज संघाच्या गोलंदाजांच्या मर्यादा पहिल्या तीन सामन्यात स्पष्ट झाल्यात. शाय होप आणि शिमरोन हेतमेयरनं आपल्या फलंदाजीनं साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलंय. त्यामुळे या सामन्यातही विंडीजची भिस्त या दोघांवरच असेल.


तर दुसरीकडे ऋषभ पंतला फलंदाजीत फारशी कमाल करता आलेली नाही. मधल्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करु शकलेली नाहीत. त्यामुळे विराटची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. आता भारतीय संघ आपल्या कामगिरीत सुधारणा करत मालिकेत पुनरागमन करणार की, विंडीजचा संघ भारताला पराभवाचा आणखी धक्का देणार याकडेच चाहत्यांचं लक्ष असेल.