मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार शतक केलं आहे. रोहितनं ९८ बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. वनडे क्रिकेटमधलं त्याचं हे २१वं शतक आहे. रोहितच्या शतकामुळे भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु झाली आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण शिखर धवन ३८ रनवर आऊट झाला. पहिल्या तिन्ही वनडेमध्ये शतक करणारा विराट या मॅचमध्ये मोठी खेळी करू शकला नाही. विराट १६ रनवर आऊट झाला. २०१८ सालचा विराटचा हा सर्वात कमी स्कोअर आहे. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शतकाबरोबरच रोहितनं अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले आहेत. ओपनर म्हणून रोहितचं हे १९वं शतक आहे.


२१ शतकांसाठी सर्वात कमी इनिंग 


हाशीम आमला- ११६ इनिंग 


विराट कोहली- १३८ इनिंग 


एबी डिव्हिलियर्स- १८३ इनिंग 


रोहित शर्मा- १८६ इनिंग 


सचिन तेंडुलकर- २०० इनिंग 


सौरव गांगुली- २१७ इनिंग


१९ शतकांसाठी सर्वात कमी इनिंग (ओपनर) 


हाशीम आमला- १०२ इनिंग 


रोहित शर्मा- १०७ इनिंग 


सचिन तेंडुलकर- ११५ इनिंग 


तिलकरत्ने दिलशान- १५२ इनिंग 


क्रिस गेल- १७२ इनिंग 


जानेवारी २०१३ पासून सर्वाधिक शतकं 


विराट कोहली- २५ शतकं 


रोहित शर्मा- १९ शतकं 


हाशीम आमला- १६ शतकं 


शिखर धवन- १५ शतकं 


क्विंटन डी कॉक, रॉस टेलर, जो रूट- १३ शतकं


रोहित शर्माची लागोपाठ ९ सीरिजमध्ये शतकं


चॅम्पियन्स ट्रॉफी- १ शतक 


श्रीलंकेविरुद्ध- २ शतकं 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध- १ शतक 


न्यूझीलंडविरुद्ध- १ शतक 


श्रीलंकेविरुद्ध- १ शतक 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध- १ शतक 


इंग्लंडविरुद्ध- १ शतक 


आशिया कप- १ शतक 


वेस्ट इंडिजविरुद्ध- २ शतकं