मुंबई : दक्षिण आफ्रिके विरुद्ध दारूण पराभव पदरात पडल्यानंतर आता घरच्या मैदानात टीम इंडियाला क्लीन स्वीप मिळवण्याचं टार्गेट असणार आहे. टीम इंडियाचे वेस्ट इंडिज विरुद्ध सामने 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढू शकते. टीम इंडियाला या खेळाडूची कमतरता जाणवणार आहे. याचं कारण हा खेळाडू टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्रिकेटपटूच्या असण्याने टीम इंडियाचा भार हलका होतो. टीम इंडियासाठी तो बऱ्याचदा गेम चेंजर ठरतो. टीम इंडियाला सामना जिंकणं या खेळाडूमुळे शक्य होतं. टीम इंडियाचा घातक ऑलाराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याला न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि आता वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर झाला आहे. 


आपल्या खराब फिटनेसमुळे हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून अडचणीत सापडला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्येही हार्दिकच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. न्यूझीलंड मालिका आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही सीरिजपूर्वी या ऑलराऊंडर खेळाडूनं काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 


हार्दिकला फॉर्मच्या बाबतीत अनेक अडचणी येत असतील, पण संघातील त्याची उपस्थिती ही मोठी ताकद मानली जाते. हार्दिक हा टीम इंडियामध्ये 6 व्या स्थानावर उतरणारा खेळाडू आहे. त्याची बॅट चालली तर अख्खा गेम चेंजर ठरतो. मात्र तोच या सीरिजमधून बाहेर असल्याने आता रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. 


हार्दिक पांड्या बॉलिंग करत नाही. मात्र सध्या तो आपल्या बॅटिंगवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. लवकरच तो पुन्हा ऑलराऊंडर फॉर्ममध्ये मैदानात उतरताना दिसणार असल्याचे त्याने बीसीसीआयला वचन दिलं आहे. आता IPL मध्ये हार्दिक पांड्या पुन्हा फॉर्ममध्ये दिसेल अशी आशा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पांड्या त्यावर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.