मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात आली. या सीरिजमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. सीरिज 3-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाने सीरिज जिंकल्यानंतर आनंद साजरा केला. कर्णधार रोहित शर्माने विजयाचे खरे हिरो कोण तेही यावेळी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान


वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं रविवारी मोठं विधान केलं आहे. यावेळी रोहित शर्मा खूप आनंदात होता. सूर्यकुमार यादवने 31 बॉलमध्ये धमाकेदार खेळी करत 61 धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरनं 19 बॉलमध्ये 35 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने तुफानी खेळी करत सीरिज जिंकली. 


टीम इंडियाची कामगिरी
रोहित शर्माने निवडलेले प्लेइंग इलेव्हन पाहता ही टीम सर्वात युवा टीम असल्याचं दिसत आहे. या युवा खेळाडूंनी कमाल कामगिरी केली आहे. नव्या खेळाडूंना देखील कठीण परिस्थितीमध्ये कसं खेळायचं, समोरच्यावर कसा दबाव तयार करायचा हे शिकायला मिळालं. मला माझ्या टीमवर गर्व आहे अशी भावना यावेळी रोहित शर्माने व्यक्त केली. 


गोलंदाजांबद्दल काय म्हणाला रोहित शर्मा?
सीरिज जिंकल्याचा खूप मोठा आनंद आहे. आम्हाला जे हवं ते सगळं मिळालं. ही युवा टीम आहे. आमचं ध्येय आता पुढचा विश्वकप आहे. शार्दुल ठाकुर, वेंकटेश अय्यर आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या आहेत.