IND vs WI: शिखर धवनला खुणावतोय `हा` रेकॉर्ड, तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचण्याची संधी
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेनमधील क्विन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेनमधील क्विन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील रोमहर्षक विजयानंतर टीम इंडियाची नजर तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीपकडे असणार आहे.त्याचबरोबर कर्णधार शिखर धवनचं लक्ष एका विशेष रेकॉर्ड असणार आहे.
तिसऱ्या वनडे सामन्य़ात धवनला एक रेक़ॉर्ड त्याच्या नावे करण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे 2 बॉलमध्य़े 2 चौकार मारताच त्याला हा मोठा विश्वविक्रम आपल्या नावे करता येणार आहे. कर्णधार शिखर धवनने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी दोन चौकार मारले तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 800 चौकार पूर्ण करेल. आतापर्यंत धवनच्या नावावर 153 सामन्यांच्या 150 डावांमध्ये 798 चौकार आहेत.
शिखर धवनच्या आधी 8 दिग्गज भारतीय खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 800 चौकार मारले आहेत. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय
1- सचिन तेंडुलकर - 2016
2- विराट कोहली - 1159
3- वीरेंद्र सेहवाग - 1132
4- सौरव गांगुली - 1122
5- राहुल द्रविड – 950
6- युवराज सिंग – 908
7- रोहित शर्मा – 856
8- एमएस धोनी - 826
9- शिखर धवन – 798