T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज असा सामना आज दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने 6 विकेट्सने हा सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला नमवल्यानंतर आता टीम इंडियाच्या महिलांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. रिषा घोषने चौकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. 18.1 ओव्हर्समध्ये भारतीय महिलांनी लक्ष्य पूर्ण केलं आहे. 


टीम इंडियाला 119 रन्सचं आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या महिलांनी टीम इंडियाला अवघ्या 119 रन्सचं आव्हान दिलं होतं. वेस्ट इंडिजकडून स्टेफनी टेलरने सर्वाधिक म्हणजेच 42 रन्स केले. याशिवाय शेमेन कँपबेलने 30 रन्स तर चेडियन नेशनने 18 बॉल्समध्ये 21 रन्सची खेळी केली. वेस्ट इंडिजच्या महिलांना तब्बल 6 विकेट्स गमावत केवळ 118 रन्सपर्यंत मजल मारता आली.


119 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मंधाना आणि शेफाली यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी 3.3 ओव्हर्समध्ये 32 रन्स केले. शेफालीने 23 बॉल्समध्ये 28 रन्स तर स्मृती मंधानाने 10 रन्स केले. शेफाली वर्मा आणि स्मृती बाद झाल्यानंतर, गेल्या सामन्यातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज (1 रन) कडून बाद झाली. 


यानंतर रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांनी 72 रन्स करत भारताचा विजय निश्चित केला. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष 32 बॉल्समध्ये 44 रन्स करून नाबाद राहिली. यादरम्यान रिचाने पाच फोर मारले. त्याचवेळी हरमनप्रीत कौरने 42 बॉल्समध्ये 33 रन्सची खेळी केली. भारताने 11 बॉल बाकी असताना चार विकेट्सच्या मोबदल्यात 119 रन्स करून सामना जिंकला.