मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वन डे सीरिजमध्ये व्हाईट वॉश दिल्यानंतर आता लक्ष टी 20 सीरिजवर असणार आहे. टीम इंडियाने 3-0 ने वन डे सीरिजवर कब्जा मिळवला. या सीरिजनंतर आयसीसी वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाला नेमका काही फायदा झाला की तोटा झाला ते जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने 119 धावांनी तिसरा वन डे सामना जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने आयसीसी वन डे रँकिंगमध्ये आपलं तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंड आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंड तर तिसऱ्या स्थानावर टीम इंडिया आहे. चौथ्या स्थानावर पाकिस्तान आहे. 


टीम इंडिया 110 अंकांनी तिसऱ्या स्थानावर कायम आहे. टीम इंडियाला याचा कोणताही फायदा झाला नाही किंवा तोटाही झाला नाही. तर पाकिस्तान 106 अंकांनी चौथ्या स्थानावर आहे. टीम इंडिया आतापर्यंत 12 वेळा वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे सीरिज जिंकली आहे. 


न्यूझीलंड पहिल्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडकडे 128 तर इंग्लंडकडे 119 पॉईंट आहेत. इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने 15 सामने खेळून 128 पॉईंट्स मिळवले आहेत. 


पाकिस्तान चौथ्या स्थानावर असल्याने आता टीम इंडियाला धोका आहे. कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये 4 पॉईंटचा फरक आहे. पाकिस्तान नेदरलँड विरुद्ध वन डे सीरिज खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला याचा फटका बसू शकतो. तर टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे विरुद्ध 3 वन डे सामने खेळणार आहे.