तिरुवनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज पाचवी आणि शेवटची वनडे होणार आहे. भारत जर आजचा सामना जिंकतो तर 3-1 ने सीरीज देखील आपल्या नावे करेल. भारतीय टीमने ऑक्टोबर 2015 पासून घरच्या मैदानावर पाच वनडे सीरीज जिंकल्या आहेत. या वनडे सिरीजमध्ये भारत चार सामन्यांमध्ये 2-1 ने पुढे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हा पहिला वनडे सामना होणार आहे. याआधी या मैदानावर एक टी20 सामना खेळला गेला आहे. ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर एकाच वेळी 45 हजार लोकं सामना पाहू शकता.


रोहित, कोहली, रायडू फॉर्ममध्ये 


भारत विजयाचा प्रबळ दावेदार असला तरी वेस्ट इंडिजच्या टीमला कमी आखून चालणार नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि मिडिलऑर्डरमध्ये अंबाती रायडू चांगली कामगिरी करत आहेत. विराट कोहलीने याआधीच्या 3 सामन्यामध्ये लागोपाठ 3 शतकं ठोकत रेकॉर्ड केला आहे. शिखर धवन आणि धोनीची बॅट सध्या शांत आहे. पण केदार जाधवची जर निवड झाली तर बॅटींग सोबतच बॉलिंग देखील मजबूत होईल.


खलील अहमदच्या कामगिरीवर नजर


खलील अहमदने मागच्या सामन्यात 3 विकेट घेत अनेकांना प्रभावित केलं होतं. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी देखील चांगली कामगिरी केली होती. केएल राहुल देखील एक संधी दिली जाऊ शकते.


भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, ऋषभ पंत, महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे आणि केदार जाधव.


वेस्टइंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), फेबियान एलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरोन हेटमायर, शाई होप, अल्जारी जोसेफ, एविन लुईस, एश्ले नर्स, कीमो पॉल, रोवमैन पॉवेल, केमार रोच और मार्लोन सॅमुअल्स.